ETV Bharat / sports

कर्णधार स्टोक्सचा 'चौकार', विंडीजच्या पहिल्या डावात 318 धावा - eng vs wi match score news

सलामीवीर क्रेग ब्रेथवेटने 65, डॉवरिचने 61 आणि रोस्टन चेसने 47 धावांचे योगदान दिले. तर, इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने 49 धावांत 4, अँडरसनने 62 धावांत 3, बेसने 51 धावांत 2 आणि मार्क वुडने 1 बळी टिपला.

third day of england vs west indies first test match report
कर्णधार स्टोक्सचा 'चौकार', विंडीजच्या पहिल्या डावात 318 धावा
author img

By

Published : Jul 11, 2020, 12:16 PM IST

साऊथम्प्टन - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी वेस्ट इंडीजने इंग्लंडवर 114 धावांची आघाडी घेतली. विंडीजने पहिल्या डावात 318 धावा केल्या. सलामीवीर क्रेग ब्रेथवेटने 65, डॉवरिचने 61 आणि रोस्टन चेसने 47 धावांचे योगदान दिले. तर, इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने 49 धावांत 4, अँडरसनने 62 धावांत 3, बेसने 51 धावांत 2 आणि मार्क वुडने 1 बळी टिपला. इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांनी बिनबाद 15 धावा केल्या होत्या. यजमान इंग्लंडचा संघ अजूनही 99 धावांनी पिछाडीवर आहे.

तत्पूर्वी, पावसामुळे उभय संघातील पहिले सत्र वाया गेले होते. कोरोनानंतरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय आणि ऐतिहासिक सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरच्या सहा बळींच्या जोरावर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 204 धावांत आटोपला. कर्णधार स्टोक्स आणि बटलर यांनी सहाव्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी रचली. या दोघानंतर इंग्लंडचा संघ ढेपाळला. स्टोक्सने 7 चौकारांसह 43 तर बटलरने 6 चौकारांसह 35 धावा केल्या. विंडीजकडून होल्डने 42 धावांत 6 तर शेनन गॅब्रियलने 62 धावांत 4 बळी घेतले.

कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद आहे. तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघातील कसोटी मालिकेतून क्रिकेट परतले आहे. या स्पर्धेचा पहिला सामना बुधवारपासून सुरू झाला. तथापि, कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने काही बदल केले आहेत, त्यानुसार ही मालिका रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय खेळवली जात आहे.

संघ -

इंग्लंड प्लेईंग XI : बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, रोरी बर्न्स, डोम बेस, जोस बटलर (यष्टीरक्षक), जॅक क्रॉले, जोए डेन्ले, ओली पोप, डोम सिब्ले, मार्क वुड.

वेस्ट इंडीज प्लेईंग XI : जेसन होल्डर (कर्णधार), जर्मेने ब्लॅकवुड, क्रेग ब्राथवेट, शारमहा ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, शेन डॉवरिच, शेनन गॅब्रिएल, शाई होप, अल्झारी जोसेफ, केमार रोच.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.