ETV Bharat / sports

रिकी पाँटिंगच्या घरात चोरी, चोरांनी पळवली गाडी! - रिकी पाँटिंग लेटेस्ट न्यूज

एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. पाँटिंगची गाडी चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून गाडीचा शोध सुरू केला. ही गाडी धोकादायक पद्धतीने शहरात हाकण्यात आल्याचे दिसून आले होते.

रिकी पाँटिंग
रिकी पाँटिंग
author img

By

Published : Feb 9, 2021, 12:34 PM IST

Updated : Feb 9, 2021, 12:59 PM IST

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. चोरट्यांनी पाँटिंगच्या घरात घुसून त्याची गाडी पळवली. पोलिसांच्या शोधकार्यात ही गाडी मेलबर्नच्या केम्बरवेल भागात सापडली. मात्र, गाडी चोरणारे अद्याप पसार आहेत.

हेही वाचा - ''आमच्या शेतकरी बापासाठी...'', सचिनच्या घराबाहेर पोस्टर झळकावून आंदोलन

एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. पाँटिंगची गाडी चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून गाडीचा शोध सुरू केला. ही गाडी धोकादायक पद्धतीने शहरात हाकण्यात आल्याचे दिसून आले होते. घरात चोरी झाली तेव्हा पाँटिग आपल्या कुटुंबासोबत मेलबर्नच्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेला होता.

यानंतर, पुढच्या २४ तासांत पोलिसांनी मोठी चपळता दाखवली. यासाठी स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप आणि एअरविंग तैनात करण्यात आले होते. पाँटिंग सध्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आहे. यासोबत तो आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचाही प्रशिक्षक आहे. गतवर्षी त्याने आपल्या प्रशिक्षणाखाली दिल्लीला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते.

रिकी पाँटिंगची कारकीर्द -

रिकी पाँटिंगने १६८ कसोटी, ३७५ एकदिवसीय आणि १७ टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने कसोटीत १३३७८, एकदिवसीयमध्ये १३७०४ आणि टी-२० मध्ये ४०१ धावा केल्या आहेत. त्याने त्याच्या कारकिर्दीत ७१ शतके ठोकली आहेत. ऑस्ट्रेलियाने २००३ आणि २००७ मध्ये पाँटिंगच्या नेतृत्वाखाली दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे. तर, २००६ आणि २००९ मध्ये त्याने संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली होती.

Last Updated : Feb 9, 2021, 12:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.