ETV Bharat / sports

गावस्कर म्हणतात, "लाहोरमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते, पण भारत-पाक मालिका नाही"

author img

By

Published : Apr 14, 2020, 5:57 PM IST

सुनील गावस्कर यांच्याशी यूट्यूब वाहिनीवर झालेल्या संभाषणात राजा म्हणाले, की भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका झाल्यास त्याचा फायदा होईल आणि यामुळे दोघांनाही शिकवण मिळेल. तथापि, गावस्कर यांनी हे स्पष्ट केले की याक्षणी असे घडू शकत नाही. "फक्त विश्वचषक किंवा आयसीसी स्पर्धेतच दोन्ही संघ सामने खेळू शकतात परंतु याक्षणी द्विप

There may be snowfall in lahore but not india-pakistan series said gavaskar
गावस्कर म्हणतात, "लाहोरमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते, पण भारत-पाक मालिका नाही"

नवी दिल्ली - "लाहोरमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते. परंतु सध्याच्या परिस्थितीत भारत-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणे कठीण आहे", असे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजा यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान गावस्कर यांनी हे उत्तर दिले.

सुनील गावस्कर यांच्याशी यू-ट्यूब वाहिनीवर झालेल्या संभाषणात राजा म्हणाले, की भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका झाल्यास त्याचा फायदा होईल आणि यामुळे दोघांनाही शिकवण मिळेल. तथापि, गावस्कर यांनी हे स्पष्ट केले की याक्षणी असे घडू शकत नाही. "फक्त विश्वचषक किंवा आयसीसी स्पर्धेतच दोन्ही संघ सामने खेळू शकतात परंतु याक्षणी द्विपक्षीय मालिकेची आशा नाही'', असे गावस्करांनी म्हटले.

गेल्या ८ वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही मालिका झाली नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दोन्ही देशांदरम्यान मालिकेचा प्रस्ताव सुचवला होता. दोन्ही देश तटस्थ ठिकाणी मालिका खेळू शकतात, असे अख्तरने म्हटले होते. यानंतर माजी कर्णधार राजाने हेच मत मांडले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.