ETV Bharat / sports

धोनी लवकरच निवृत्ती जाहीर करणार? रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट

author img

By

Published : Jan 9, 2020, 3:48 PM IST

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी सांगितले की, 'धोनी अनेक वर्ष क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. त्याने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि आता तो एकदिवसीय क्रिकेटलाही रामराम करू शकतो. त्यानंतर या वयात तो टी-२० खेळणे पसंत करेल. पण त्यासाठी त्याला पुन्हा मैदानावर उतरावे लागणार आहे.'

Team India head coach Ravi Shastri provides major update on MS Dhoni's future
धोनी लवकरच निवृत्ती जाहीर करु शकतो, रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी धोनी लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करु शकतो, असे सांगितले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी सांगितले की, 'धोनी अनेक वर्ष क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. त्याने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि आता तो एकदिवसीय क्रिकेटलाही रामराम करू शकतो. त्यानंतर या वयात तो टी-२० खेळणे पसंत करेल. पण त्यासाठी त्याला पुन्हा मैदानावर उतरावे लागणार आहे.'

Team India head coach Ravi Shastri provides major update on MS Dhoni's future
धोनी रवी शास्त्री यांच्यासोबत....

धोनीने विश्व करंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण त्याने अद्यापही निवृत्तीबाबतची स्पष्टता दिलेली नाही. अशात ऑस्ट्रेलियातील त्याचा अनुभव संघासाठी उपयोगी ठरू शकतो. आयपीएलमध्ये त्याचा सहभागही टी-२० विश्व करंडक स्पर्धेची तयारी समजली जात आहे. आयपीएलमध्ये त्याने दमदार कामगिरी केली, तर त्याला टी-२० संघात नक्की जागा मिळेल, असेही शास्त्रींनी सांगितले.

दरम्यान, धोनीने आजघडीपर्यंत भारताकडून ९० कसोटी, ३५० एकदिवसीय आणि ९८ टी-२० सामने खेळली आहेत. यात त्याने अनुक्रमे ४८७६, १०७७३ आणि १६१७ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने यष्टिरक्षणात, कसोटीत २५६ झेल व ३८ स्टम्पिंग, एकदिवसीयमध्ये ३२१ झेल व १२३ स्टम्पिंग आणि टी-२० त ५७ झेल व ३४ स्टम्पिंग केले आहेत.

हेही वाचा - IND VS NZ : न्यूझीलंडला गळती, दुखापतीने लॅथम 'आऊट' तर बोल्टबाबत साशंकता

हेही वाचा - 'चार दिवसीय कसोटी सामन्याची संकल्पना म्हणजे मूर्खपणा'

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.