सिल्हेट - अनुभवी फलंदाज तमीम इक्बाल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७००० धावा ठोकणारा पहिला बांगलादेशी क्रिकेटपटू ठरला आहे. तमीमने मंगळवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात १५८ धावांची शानदार खेळी केली. नऊ महिन्यांच्या अंतरानंतर तमिमने आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला आहे.
-
Congratulations to .@TamimOfficial28 who becomes the first Bangladeshi batsman to score 7000 ODI runs.#BANvZIM #RiseOfTheTigers pic.twitter.com/BNnJSMwELg
— Bangladesh Cricket (@BCBtigers) March 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congratulations to .@TamimOfficial28 who becomes the first Bangladeshi batsman to score 7000 ODI runs.#BANvZIM #RiseOfTheTigers pic.twitter.com/BNnJSMwELg
— Bangladesh Cricket (@BCBtigers) March 3, 2020Congratulations to .@TamimOfficial28 who becomes the first Bangladeshi batsman to score 7000 ODI runs.#BANvZIM #RiseOfTheTigers pic.twitter.com/BNnJSMwELg
— Bangladesh Cricket (@BCBtigers) March 3, 2020
हेही वाचा - शेर आया शेर! हार्दिक पांड्याचं वेगवान शतक..
२०१९ च्या मध्यातून तमीमने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याने १६६ चेंडूंचा सामना करत २० चौकार आणि ३ षटकार ठोकले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तमिमने बांगलादेशकडून सर्वाधिक शतके केली आहेत. मात्र, २०१८ च्या जुलैनंतर, तमीमला एकही शतक करता आले नव्हते. यंदा तमीमने टी-२० सामने खेळले आहेत. पाकिस्तानविरुद्ध जानेवारीत त्याने ३९ आणि ६५ धावा केल्या होत्या.
त्यानंतर प्रथम श्रेणी सामन्यात तमीमने ३३४ धावांची खेळी केली. या स्वरूपातील क्रिकेटमध्ये बांगलादेशी फलंदाजाची ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.