नवी दिल्ली - एकेकाळी भारतासह अनेक मातब्बर संघाला पराभवाचा धक्का देणाऱ्या झिम्बाब्वे संघाचा वाईट काळ सुरू आहे. आंतराराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही दिवसांपूर्वी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी झिम्बाब्वे संघाचे निलंबन केले. यामुळे त्यांना आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. ऑक्टोंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्वकरंडकासाठी पात्रता सामने होणार आहे. या पात्रता फेरीसाठी झिम्बाब्वे संघाच्या ठिकाणी नायझेरियाच्या संघाला संधी मिळाली आहे.
टी-२० विश्वकरंडकासाठी ऑक्टोंबर महिन्यात युएईमध्ये पात्रता सामने खेळवण्यात येणार आहेत. या पात्रता फेरीत १४ व्या क्रमांकासाठी नायझेरियाला झिंम्बाब्वेच्या ठिकाणी संधी देण्यात आली आहे. पात्रता फेरीमध्ये नायझेरीया, युएई, हाँगकाँग, आयरलँड, जर्सी, नेदरलंड, केनिया, नामेबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी, स्टॉटलंड, सिंगापूर, आणि अमेरिकेचे दोन संघ असे एकूण चौदा संघामध्ये सामने होणार आहेत.
दरम्यान, आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेटवर तत्काळ प्रभावाने निलंबनाची कारवाई करण्यात होती. लंडनमध्ये झालेल्या आयसीसीच्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला होता. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेत होत असलेल्या अनियमितता लक्षात घेत आयसीसीच्या सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला होता. यंदा आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा २०२० मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार आहे.