मुंबई - तामिळनाडू संघाने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात तामिळनाडूने राजस्थानचा ७ गडी राखून पराभव केला.
अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात राजस्थानने नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी केली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ९ गड्यांच्या मोबदल्यात १५४ धावा केल्या. प्रत्त्युत्तरादाखल तामिळनाडूने राजस्थानचे हे आव्हान १८.४ षटकांत तीन गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.
अरुण कार्तिकने ५४ चेंडूत ९ चौकार आणि तीन षटकाराच्या मदतीने ८९ धावांची खेळी केली. तर त्याला कर्णधार दिनेश कार्तिकने १७ चेंडूत नाबाद २६ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. दोघांनी चौथ्या गड्यासाठी ८९ धावांची भागिदारी केली. अरुण कार्तिकला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा - सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा : बडोद्याची अंतिम फेरीत धडक
हेही वाचा - PAK VS SA TEST : पाकिस्तानचा आफ्रिकेवर ७ गडी राखून विजय