ETV Bharat / sports

सय्यद मुश्ताक अली करंडक 2021 : असे आहे उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक

author img

By

Published : Jan 24, 2021, 10:20 AM IST

सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली असून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना 26 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे.

syed mushtaq ali trophy 2021 knockout round schedule announced
सय्यद मुश्ताक अली करंडक 2021 : असे आहे उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक

मुंबई - सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली असून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना 26 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. याचे वेळापत्रक समोर आले आहे. दरम्यान, स्पर्धेचा अंतिम सामना 31 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे.

कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, हरियाणा, बडोदा, बिहार आणि राजस्थान या संघांनी बाद फेरी गाठली आहे. कर्नाटक आणि पंजाब यांच्यात 26 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सरदार पटेल स्टेडियमवर स्पर्धेचा पहिला उपांत्यपूर्व सामना खेळला जाणार आहे. त्याच दिवशी दुसरा उपांत्यपूर्व सामना तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश यांच्यात संध्याकाळी 7 पासून खेळला जाईल.

असे आहे वेळापत्रक

  • 26 जानेवारी: कर्नाटक विरुद्ध पंजाब, पहिला उपांत्यपूर्व सामना, वेळ दुपारी 12
  • 26 जानेवारी: तामिळनाडू विरुद्ध हिमाचल प्रदेश, दुसरा उपांत्यपूर्व सामना, वेळ संध्याकाळी 7
  • 27 जानेवारी: हरियाणा विरुद्ध बडोदा, तिसरा उपांत्यपूर्व सामना, वेळ - दुपारी 12
  • 27 जानेवारी: बिहार विरुद्ध राजस्थान, उपांत्यपूर्व सामना, वेळ - संध्याकाळी 7
  • 29 जानेवारी: पहिला उपांत्य सामना, वेळ - दुपारी 12
  • 29 जानेवारी: दुसरा उपांत्य सामना, वेळ - संध्याकाळी 7

हेही वाचा - Sri Lanka vs England : अँडरसन एक्सप्रेस सुसाट, ग्लेन मॅग्राथला टाकले मागे

हेही वाचा - आनंद महिंद्रांची टीम इंडियाच्या नव्या शिलेदारांना 'महागडी' भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.