ETV Bharat / sports

मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईवर रैनाची प्रतिक्रिया आली समोर... - ड्रॅगन फ्लाय नाइट क्लब न्यूज

मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईवर सुरेश रैनाची प्रतिक्रिया आली समोर आली आहे. रैनाच्या मॅनेजमेंट टीमकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी, रैना हा एका शूटसाठी मुंबईत आला होता, अशी माहिती दिली आहे. एका मित्राने डिनरसाठी बोलावल्यामुळे रैना ड्रॅगन फ्लाय नाइट क्लमध्ये गेला होता. त्याला स्थानिक वेळा आणि प्रोटोकॉलची माहिती नव्हती, असेही त्याच्या मॅनेजमेंट टीमने सांगितले आहे.

suresh-raina-s-management-team-releases-statement-after-the-cricketer-was-arrested-in-mumbai
मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईवर रैनाची प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला...
author img

By

Published : Dec 22, 2020, 7:36 PM IST

मुंबई - मुंबई पोलिसांनी ड्रॅगन फ्लाय नाइट क्लबवर सोमवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास धाड टाकून कारवाई केली. यावेळी सुरेश रैनादेखील नाइट क्लबमध्ये उपस्थित होता. तेव्हा पोलिसांनी कारवाई करत रैनासह ३४ जणांना अटक केली होती. अटकेनंतर रैनाची जामीनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईवर सुरेश रैनाने प्रतिक्रिया दिली आहे.

रैनाच्या मॅनेजमेंट टीमकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी, रैना हा एका शूटसाठी मुंबईत आला होता, अशी माहिती दिली आहे. एका मित्राने डिनरसाठी बोलावल्यामुळे रैना ड्रॅगन फ्लाय नाइट क्लमध्ये गेला होता. त्याला स्थानिक वेळा आणि प्रोटोकॉलची माहिती नव्हती, असेही त्याच्या मॅनेजमेंट टीमने सांगितले आहे. पुढे त्यांनी, रैनाने या घटनेबाबत खेद व्यक्त केल्याचे सांगत, तो नेहमीच प्रशासनाकडून आखून दिलेल्या नियमांचे पालन करत असून भविष्यातही करत राहील, असे सांगितलं आहे.

काय आहे प्रकरण –

राज्यात मंगळवारी रात्रीपासून ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशात सोमवारी मध्यरात्री ड्रगन फ्लाय क्लबमध्ये पार्टी सुरू होती. तेव्हा पोलिसांनी या क्लबवर छापा टाकत कारवाई केली. यात सुरेश रैनासह ३४ जणांविरोधात कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Year Ender 2020: या वर्षामध्ये चर्चेत आलेले विवाद; बाबरपासून मेस्सीपर्यंतच्या कॉन्ट्रोवर्सी, जाणून घ्या...

हेही वाचा - IND Vs AUS : मेलबर्न कसोटी खेळणार की नाही, स्मिथने स्वत:च दिले अपडेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.