ETV Bharat / sports

कोरोना युद्ध : ‘चिन्नाथाला’ची ५२ लाखांची मदत

रैनापूर्वी सचिन तेंडुलकरने 50 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. सचिनने पंतप्रधान मदत निधीला 25 लाख तर मुख्यमंत्री मदत निधीला 25 लाख रुपये दिले आहेत. या दोघांव्यतिरिक्त बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, पी.व्ही. सिंधु, गौतम गंभीरने योगदान दिले आहे.

author img

By

Published : Mar 28, 2020, 9:01 PM IST

Suresh raina donates 52 lakhs For the Fight against covid 19
कोरोना युद्ध : ‘चिन्नाथाला’ची ५२ लाखांची मदत

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी 52 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. रैनाने पंतप्रधान मदत निधीला 31 लाख आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मदत निधीला 21 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. रैनाने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना आवाहन केले आणि सांगितले की प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे आणि घरीच रहावे.

रैनापूर्वी सचिन तेंडुलकरने 50 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. सचिनने पंतप्रधान मदत निधीला 25 लाख तर मुख्यमंत्री मदत निधीला 25 लाख रुपये दिले आहेत. या दोघांव्यतिरिक्त बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, पी.व्ही. सिंधु, गौतम गंभीरने योगदान दिले आहे.

कोरोना विषाणू विरोधातील लढाईसाठी टाटा ट्रस्टने 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपकरणे, रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा, तपासणी किट, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी ही मदत खर्च करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.