ETV Bharat / sports

सुनील गावसकरांची 'ती' टोपी लिलावात - ravi shastri's coaching kit auctioned

सुनील गावसकर यांनी १९७१च्या इंग्लंड दौर्‍यावर परिधान केलेली टोपी आणि टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची कोचिंग किट ऑनलाइन लिलावात खरेदी केली जाऊ शकते. हा लिलाव १६ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

Sunil gavaskar's 1971 cap and ravi shastri's coaching kit up for grab
सुनील गावसकरांची 'ती' टोपी लिलावात
author img

By

Published : Nov 1, 2020, 4:05 PM IST

नवी दिल्ली - माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी १९७१च्या इंग्लंड दौर्‍यावर परिधान केलेली टोपी आणि टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची कोचिंग किट ऑनलाइन लिलावात खरेदी केली जाऊ शकते. क्रिस्टीच्या लिलावात सर जेफ्री बॉयकॉट यांचे संग्रह आणि टी-२० चॅरिटी क्रिकेटशी संबंधित वस्तूंचा समावेश आहे. २७ ऑक्टोबरपासून हा लिलाव सुरू झाला आहे.

सर जेफ्री बॉयकॉट यांच्या संग्रहात बर्‍याच संस्मरणीय गोष्टी आहेत. यामध्ये एक बॅट असून या बॅटने प्रथम श्रेणीच्या सामन्यात त्यांनी १००वे शतक पूर्ण केले होते. हेडिंग्ले येथे ११ ऑगस्ट १९७७ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‌ॅशेस कसोटी सामन्यात त्यांनी घरच्या मैदानात हा पराक्रम केला. या बॅटला ३० ते ५० हजार पौंड (सुमारे २८.९५-४८.२५ लाख रुपये) मिळण्याची शक्यता आहे.

मायकेल होल्डिंग यांचा शर्टदेखील लिलावात -

या लिलावात मायकेल होल्डिंग यांचा शर्टदेखील आहे. त्यांनी १४ मार्च १९८१ रोजी ब्रिजटाऊनमध्ये बॉयकॉट यांना शून्यावर बाद केले. त्यावर होल्डिंग यांची स्वाक्षरी आहे. १९७१मध्ये भारताच्या इंग्लंड दौर्‍यावर गावसकर यांनी घातलेली कॅपही या संग्रहात समाविष्ट आहे. हा लिलाव १६ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.