नवी दिल्ली - अमेरिकन कंपनी ट्रिटोन सोलारने आपल्या ब्रँड अँम्बेसेडरपदी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना नेमले आहे. लिटल मास्टरसोबतच बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी यालाही कपंनीच्या ब्रँड अँम्बेसेडरपदी नेमण्यात आले आहे.
हेही वाचा - IND VS SA : अखेरच्या सामन्यावर पावसाचे सावट...
या संबंधी ट्रिटोन सोलारने घोषणा केली. 'दोन दिग्गज सुनील गावस्कर आणि बॉलीवूड स्टार सुनील शेट्टी ट्रिटोनच्या सर्वोत्तम व्यवस्थापनाशी जोडले गेले आहेत.'
हेही वाचा - 'मला पुरस्कारापेक्षा देशासाठी पदके जिंकलेली आवडतात', विक्रमवीर पांघलची प्रतिक्रिया
या नियुक्तीनंतर गावस्कर म्हणाले, 'मी ट्रिटोनसोबत जोडलो गेल्याने आनंदित आहे. भारताची वीज उपलब्धता परिस्थिती बदलण्यासाठी कमी खर्चात निदान आवश्यक आहे. त्यामुळे मला आशा आहे की अखंडित वीजपुरवठ्याशी संबंधित मुख्य प्रश्न ट्रिटोन सोडवेल.'