ETV Bharat / sports

'वर्ल्डकप हिरो' स्टोक्स निधी गोळा करण्यासाठी धावणार - ben stokes raise fund news

स्टोक्स म्हणाला, ''मी हाफ मॅरेथॉनचा नेहमी विचार केला होता. मात्र, मला तसे करायला कधीच मिळाले नाही. आम्ही लॉकडाउनमध्ये होतो, म्हणून मला वाटले ही बाहेर जाण्याची उत्तम संधी आहे. या मॅरेथॉनद्वारे मी काही निधी उभारण्याचादेखील प्रयत्न करू शकतो. "

Stokes will run in the half marathon to raise money
'वर्ल्डकपहिरो' स्टोक्स निधी गोळा करण्यासाठी धावणार
author img

By

Published : May 5, 2020, 1:34 PM IST

लंडन - इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने मंगळवारी चॅरिटीसाठी पैसे गोळा करण्यासाठी हाफ मॅरेथॉनमध्ये धावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्टोक्स प्रथमच हॉफ मॅरेथॉनमध्ये धावणार आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) आणि नॅशनल चिल्ड्रन्स क्रिकेट चॅरिटी चान्स टू शाइनसाठी तो निधी जमवणार आहे.

स्टोक्स म्हणाला, ''मी हाफ मॅरेथॉनचा नेहमी विचार केला होता. मात्र, मला तसे करायला कधीच मिळाले नाही. आम्ही लॉकडाउनमध्ये होतो, म्हणून मला वाटले ही बाहेर जाण्याची उत्तम संधी आहे. या मॅरेथॉनद्वारे मी काही निधी उभारण्याचादेखील प्रयत्न करू शकतो. "

तो पुढे म्हणाला, "मला आशा आहे की लोकांना क्रिकेट गार्डन मॅरेथॉनमध्ये देणगी देण्यासाठी काही प्रेरणा मिळेल. त्यांनी केलेल्या कामात आणखी काही निधी जमा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. ते एनएचएसला पाठिंबा देत आहेत आणि चान्स टू शाईन यांचेही समर्थन आहे.''

चान्स टू शाईन ही एक राष्ट्रीय क्रिकेट धर्मादाय संस्था आहे, जी दरवर्षी इंग्लंड आणि वेल्समधील प्राथमिक शाळांसाठी क्रिकेट कोचिंग सत्राचे आयोजन करते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.