लंडन - इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथने दमदार प्रदर्शन करत चाहत्यांची मने जिंकली. या मालिकेत स्मिथने खेळलेल्यापैकी ८२ धावांची खेळी ही त्याची कमी धावसंख्येची खेळी होती. तर, २११ धावांची खेळी ही त्याची सर्वोच्च खेळी होती.
हेही वाचा - कणकवलीच्या अथर्वचे प्रतिष्ठेच्या लडाख मॅरेथॉनमध्ये यश!
'स्मिथने कितीही चांगले प्रदर्शन केले तरी तो चीटर म्हणूनच ओळखला जाईल', अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा माजी खेळाडू स्टीव हार्मिसनने दिली आहे. स्मिथच्या बॉल टेंपरिंग प्रकरणामुळे हार्मिसन खुप नाराज आहे. त्याने मैदानावर कितीही चांगली कामगिरी केली तरी तो चीटर म्हणूनच ओळखला जाईल, असे हार्मिसनने म्हटले आहे.
एका वर्षापूर्वीच्या सँडपेपर प्रकरणामुळे स्मिथला टीकेला सामोरे जावे लागले होते. स्मिथसोबत सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, कॅमरुन बॅनक्रॉफ्ट यांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बंदीला तोंड द्यावे लागले होते.
चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विजय -
ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना 185 धावांनी जिंकत मालिकेत 2-1 अशी बढत घेतली आहे. शेवटच्या दिवशी यजमान इंग्लंड संघाला 383 धावा करावयाच्या होत्या. मात्र इंग्लंडचा संघ 197 धावांवर आटोपला. पहिल्या डावात 211 आणि दुसऱ्या डावात 82 धावांची खेळी करणाऱ्या स्मिथला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.