नवी दिल्ली - बंदीनंतर दणक्यात पुनरागमन केलेला स्टीव्ह स्मिथ सध्या स्वप्नवत क्रिकेट खेळतो आहे. स्मिथ जेवढी शानदार फलंदाजी करतो त्यासोबत तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षणही करतो. अनेक कठीण झेल त्याने नानाविध प्रकाराने टिपले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात त्याने असाच एक भन्नाट कारनामा करून दाखवला.
हेही वाचा - विराटची 'ट्विटर'वरची कमाई वाचाल, तर थक्क व्हाल!
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा टी-२० सामना खेळवण्यात आला. अटीतटीच्या लढतीत आफ्रिकेने या सामन्यात १२ धावांनी बाजी मारली. दरम्यान, आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डी कॉकने मारलेला एक उत्तुंग फटका स्मिथने हवेत उडी मारून अडवला. सीमारेषेवर त्याने केलेले 'हवाई क्षेत्ररक्षण' पाहून सर्वजण चकित झाले. पाहा स्मिथने अडवलेला हा चेंडू -
-
This is just unbelievable fielding from Steve Smith.
— The Oracle (@BigOtrivia) February 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Don’t think I’ve seen better. #Superman pic.twitter.com/FtfzhcuTwz
">This is just unbelievable fielding from Steve Smith.
— The Oracle (@BigOtrivia) February 23, 2020
Don’t think I’ve seen better. #Superman pic.twitter.com/FtfzhcuTwzThis is just unbelievable fielding from Steve Smith.
— The Oracle (@BigOtrivia) February 23, 2020
Don’t think I’ve seen better. #Superman pic.twitter.com/FtfzhcuTwz
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ४ गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावा केल्या. कर्णधार क्विंटन डी कॉकने ४७ चेंडूत ७० धावा केल्या. १५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ६ बाद १४६ धावा करू शकला. डी कॉकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.