लंडन - अॅशेसच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरच्या वेगवान चेंडूने जखमी झालेला स्टीव स्मिथ सामन्याच्या उरलेल्या सत्रातून संघाबाहेर पडला आहे.
लॉर्ड्सवर सुरू असलेल्या अॅशेसच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव स्मिथला जोफ्रा आर्चरचा वेगवान चेंडू लागला. मानेवर आदळलेल्या या चेंडूने स्मिथ जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले. काही वेळानंतर स्मिथ पुन्हा मैदानात उतरला. त्याने आणखी ९ चेंडूत १२ धावांची भर घालत तो व्यक्तिगत ९२ धावांवर बाद झाला.
-
BREAKING: Massive news from Lord's with Steve Smith ruled out of the Test with delayed concussion. More to come... #Ashes pic.twitter.com/2TzT7rucU7
— cricket.com.au (@cricketcomau) August 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BREAKING: Massive news from Lord's with Steve Smith ruled out of the Test with delayed concussion. More to come... #Ashes pic.twitter.com/2TzT7rucU7
— cricket.com.au (@cricketcomau) August 18, 2019BREAKING: Massive news from Lord's with Steve Smith ruled out of the Test with delayed concussion. More to come... #Ashes pic.twitter.com/2TzT7rucU7
— cricket.com.au (@cricketcomau) August 18, 2019
दुखापतग्रस्त स्मिथच्या बदली मार्कस लाबुशेनला संघात सामिल करण्यात आहे.त्यामुळे स्मिथ तिसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून तिसरा कसोटी सामना सुरू होणार आहे.
अॅशेसच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या शतकाच्या बळावर इंग्लंडने ५ बाद २४२ धावा केल्या आहेत. यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर २५० धावांची आघाडी घेतली आहे.