नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने लॉकडाऊनमध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे. त्याने बुधवारी इन्स्टाग्रामवर वेगळ्या फलंदाजीचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो 'वॉल क्रिकेट' खेळताना दिसून येत आहे.
कोरोना व्हायरसमुळे क्रीडा क्रियाकलाप जगभर ठप्प झाले आहेत. परंतु या काळात सराव करण्याची संधी स्मिथ गमावू इच्छित नाही. जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये समावेश असलेला स्मिथ मोकळ्या वेळेतही आपले कौशल्य वाढवण्याची कोणतीही संधी सोडत नाही.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या व्हिडिओमध्ये स्मिथ टेनिस बॉलला बॅटने सतत भिंतीवर मारत आहे. शिवाय, स्मिथने लोकांना घरी राहण्याचे आवाहनही केले. लॉकडाऊन काळात स्मिथसुद्धा इतर क्रिकेटपटूंप्रमाणेच घरीच वेळ घालवत आहे. अनेक दिग्गज खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.