नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देशभरात सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या घटनांमुळे लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. बीसीसीआयने हे आवाहन करताना भारताचा विश्वासू फलंदाज चेतेश्वर पुजाराचे उदाहरण दिले.
बीसीसीआयने ट्विटरवर पुजाराचा एक फोटो पोस्ट केला आहे. “पुजाराच्या कुटुंबाप्रमाणेच तुम्हीही स्वतः च्या घरात रहा”, असे बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले. लॉकडाउनदरम्यान संपूर्ण वेळ मुलीचा सांभाळ करण्यात जातो, असे पुजाराने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
-
The Pujara family is spending some quality time home 👨👩👧
— BCCI (@BCCI) March 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Some household chores & fun time with the little one 👶
Stay Home 🏡
Stay Safe 💙 pic.twitter.com/FOW0qVv3sO
">The Pujara family is spending some quality time home 👨👩👧
— BCCI (@BCCI) March 29, 2020
Some household chores & fun time with the little one 👶
Stay Home 🏡
Stay Safe 💙 pic.twitter.com/FOW0qVv3sOThe Pujara family is spending some quality time home 👨👩👧
— BCCI (@BCCI) March 29, 2020
Some household chores & fun time with the little one 👶
Stay Home 🏡
Stay Safe 💙 pic.twitter.com/FOW0qVv3sO
“हा बदल माझ्यासाठी स्वागतार्ह आहे. कुटुंबाबरोबर सध्या वेळ घालवत आहे. जेव्हा जेव्हा मी एकटा असतो, तेव्हा मला पुस्तके वाचायला आणि टीव्ही पाहण्यास आवडते”, असेही पुजारा म्हणाला होता.
भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 979 रुग्ण आत्तापर्यंत आढळून आले आहेत. यात 831 भारतीय तर 48 परदेशी रुग्णांचा समावेश आहे. यातील 87 जण पूर्णत: बरे झाले असून 25 जण दगावले आहेत.