ETV Bharat / sports

Corona Virus : BCCI म्हणते.. 'घरीच थांबा; आमची करडी नजर आहे'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. रोहित शर्माचा हा फोटो असून यात तो दुर्बीणमधून पाहत आहे.

Stay home everyone: BCCI asks people to stay indoors amid coronavirus pandemic
Corona Virus : BCCI म्हणते.. 'घरीच थांबा; आमची करडी नजर आहे'
author img

By

Published : Mar 25, 2020, 11:51 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जगभरातील सर्व व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. कोरोनाचा परिणाम क्रीडा विश्वावरही झाला आहे. बहुतांश स्पर्धा रद्द तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशात सर्व खेळाडू आपापल्या घरामध्ये कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत. यादरम्यान भारतीय क्रिकेट बोर्डाने एक फोटो शेअर करत, घरात राहा आमची तुमच्यावर नजर आहे, असे म्हटलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. रोहित शर्माचा हा फोटो असून यात तो दुर्बीणीतून पाहत आहे.

रोहितचा मैदानावरील फोटो शेअर करताना बीसीसीआयने म्हटले आहे की, 'तुम्ही सर्व जण घरीच राहा, आमची कडक नजर ठेवून आहोत.'

दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावामुळे बीसीसीआयने प्रथम भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका रद्द केली. त्यानंतर आयपीएल देखील १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. तसेच स्थानिक स्पर्धा देखील स्थगित करण्यात आल्या आहेत.

कोरोनाने जगभरात थैमान घातले असून दिवसेंदिवस याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आजघडीपर्यंत कोरोनामुळे १९ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर ४ लाखांहून अधिक लोकांना यांची लागण झाली आहे. भारतातही कोरोनाचे ५०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर देशात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, मंगळवार रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउन केलं जात आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

हेही वाचा - Corona Virus : भारतीयांनो! कृपा करुन घराबाहेर पडू नका, इंग्लंड क्रिकेटरने जोडले हात..

हेही वाचा - COVID-१९ : मोदींच्या लॉकडाऊन निर्णयाला क्रिकेट विश्वातून समर्थन, वाचा कोण काय म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.