ETV Bharat / sports

ड्रग्जसोबत आढळला क्रिकेटपटू! पदार्पणाच्या सामन्यात घेतली होती हॅट्ट्रिक

दंडाधिकाऱ्यांनी 25 वर्षीय मदुशनकाला दोन आठवड्यांसाठी कोठडी सुनावली आहे. रविवारी त्याला पनाला शहरात ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे दोन ग्रॅमपेक्षा जास्त हेरॉइन होती, असे पोलिसांना सांगितले आहे. जानेवारी 2018 मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करताना मदुशनकाने हॅट्ट्रिक घेतली.

author img

By

Published : May 26, 2020, 8:33 AM IST

Updated : May 26, 2020, 10:20 AM IST

Sri lankan cricketer shehan madushanka caught on charges of possessing drugs
ड्रग्जसोबत आढळला क्रिकेटपटू! पदार्पणाच्या सामन्यात घेतली होती हॅट्ट्रिक

कोलंबो - आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शेहान मदुशनकाला श्रीलंकेच्या पोलिसांनी अमलीपदार्थ (हेरॉइन) ठेवण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या लंकेच्या मदुशनकाने बांगलादेशविरुध्द एकदिवसीय सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती.

shehan madushanka
शेहान मदुशनका

दंडाधिकाऱ्यांनी 25 वर्षीय मदुशनकाला दोन आठवड्यांसाठी कोठडी सुनावली आहे. रविवारी त्याला पनाला शहरात ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे दोन ग्रॅमपेक्षा जास्त हेरॉइन होती, असे पोलिसांना सांगितले आहे.

कोरोनामुळे सुरू असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये मदुशनका गाडी चालवत होता. त्यावेळी त्याला थांबवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यासमवेत गाडीत आणखी एक व्यक्ती होती.

जानेवारी 2018 मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करताना मदुशनकाने हॅट्ट्रिक घेतली. यावर्षी याच संघाविरूद्ध त्याने दोन टी-20 सामने खेळले. पण दुखापतीमुळे मदुशनकाला कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळता आला नाही.

Last Updated : May 26, 2020, 10:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.