कोलंबो - श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱया महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व चमारी अटापट्टू हिच्याकडे देण्यात आले आहे. ही स्पर्धा २१ फेब्रुवारीपासून सुरू होईल. या आगामी स्पर्धेसाठी श्रीलंकेने पाच स्टँडबाय खेळाडूंची निवड केली आहे.
-
Sri Lanka squad for ICC Women’s T20I World Cup 2020. pic.twitter.com/nBPn4rVzH3
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) January 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sri Lanka squad for ICC Women’s T20I World Cup 2020. pic.twitter.com/nBPn4rVzH3
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) January 27, 2020Sri Lanka squad for ICC Women’s T20I World Cup 2020. pic.twitter.com/nBPn4rVzH3
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) January 27, 2020
हेही वाचा - IPL २०२० : ठरलं तर.. फायनलचा थरार रंगणार मुंबईत.. ही आहे तारीख
महत्त्वाचे म्हणजे श्रीलंकेची विश्वचषक मोहीम २२ फेब्रुवारीपासून सुरू होईल. श्रीलंका पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. शशिकला सिरियार्डिन, उदेशिका प्रोबोधानी, सुगंदिका कुमारी असे बरेच अनुभवी खेळाडूही या संघात उपस्थित आहेत. इनोका राणावीरा, ओशाडी रणसिंघे या दिग्गज खेळाडूंना मात्र या संघात स्थान मिळू शकले नाही.
२०१९ च्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेच्या महिला संघाने ऑस्ट्रेलिया दौर्यावर तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. विश्वचषक स्पर्धेपूर्वी श्रीलंका चार सराव सामने खेळणार आहे.
संघ -
चमारी अटापट्टू (कर्णधार), हर्षिता मदावी, अनुष्का संजीवनी, हंसिमा करुणारत्ने, शशिकला सिरियार्डीन, नीलाक्षी डी सिल्वा, अमा कंचना, कविता दिलहरी, उदेशिका प्रोबोधानी, अचिनी कुलसुरिया, हसीना परेरा, सत्या संदीपनी, उमेशा थिमाशिनी, सुगंदिका कुमारी, दिलानी मनोडारा.
पाच स्टँडबाय खेळाडू -
सचिनी निसनसाला, प्रसादनी वीराक्कोडे, ओशाडी राणासिंघे, थरिका सेवंडी, इनोका राणावीरा.