कोलंबो - श्रीलंकेचे क्रिकेटपटू सोमवारपासून प्रशिक्षणाला सुरुवात करतील, अशी माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिली आहे. 13 खेळाडूंच्या श्रीलंका संघाचे कोलंबो क्रिकेट क्लब येथे निवासी प्रशिक्षण शिबीर सुरुवात होणार आहे.
बोर्ड म्हणाले, "या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवड सर्व प्रारूपातून केली आहे. या शिबिरात प्रामुख्याने गोलंदाजांची संख्या अधिक आहे. कारण त्यांना कंडीशनिंगसाठी अधिक वेळेची गरज असते. एकूण 4 प्रशिक्षक या खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत.''
या शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा करूनच नियम बनवण्यात आले आहेत. या नियनमांचे पालन करण्यात येणार असल्याचेही बोर्डाने म्हटले आहे.
सोबतच या शिबिरात वापरण्यात येणाऱ्या वाहनांचेही शुद्धिकरण करण्यात येणार आहे. इतर देशांप्रमाणे श्रीलंकेतही मार्चपासून क्रिकेट बंद आहे. श्रीलंका आणि इंग्लंड यांच्या कसोटी मालिका खेळण्यात येणार होती. मात्र, कोरोनामुळे ती अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली.