हैदराबाद - आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपरकिंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात हैदराबादने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेत निर्धारीत २० षटकांमध्ये फक्त १३२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाने १६.५ षटकांमध्ये ६ गडी राखत विजय मिळवला. हा सामना हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.
-
Bairstow finishes it off in style for the @SunRisers as they win by 6 wickets here at their home ground.#SRHvCSK pic.twitter.com/TIC75863Pl
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bairstow finishes it off in style for the @SunRisers as they win by 6 wickets here at their home ground.#SRHvCSK pic.twitter.com/TIC75863Pl
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2019Bairstow finishes it off in style for the @SunRisers as they win by 6 wickets here at their home ground.#SRHvCSK pic.twitter.com/TIC75863Pl
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2019
चेन्नईकडून सलामीवीर शेन वॉटसन ३१ तर फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ४५ धावांची खेळी केली. मात्र नंतरच्या फलंदाजांना चांगल्या खेळी साकारता आल्या नसल्याने चेन्नईला १३२ धावांवरच समाधान मानावे लागले.हैदराबादसाठी राशिद खानने सर्वाधिक २ गडी बाद केले. धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सलामी जोडी जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांनी शानदार खेळी केली. वॉर्नरने ५० तर बेअरस्टो ६१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
या सामन्यात चेन्नई संघाने एक मोठा बदल केला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा नियमित कर्णधार धोनीला विश्रांती देत सुरेश रैनाकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. २०१० पासून प्रथमच चेन्नईचा संघ धोनीच्या नेतृत्वाशीवाय खेळणार आहे. धोनीच्या जागी सॅम बिलिंग्सला संघात स्थान देण्यात आले आहे. तर यजमान हैदराबाद संघात युसुफ पठाण आणि शहबाज नदीम यांना संघात स्थान दिले होते.