हैदराबाद - परफेक्ट यॉर्करने शुक्रवारी रात्री एबी डिव्हिलियर्सच्या दांड्या गुल करणारा हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजनच्या घरी, एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सनरायझर्सचा हा हरहुन्नरी खेळाडू 'बाबा' बनला आहे.
नटराजनच्या पत्नीने शुक्रवारी रात्री बाळाला जन्म दिला. याची माहिती सनरायझर्स हैदराबादने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली. यात त्यांनी नटराजन आणि तिची पत्नी पवित्रा हिला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
Sending all our love and good wishes to @Natarajan_91 & Pavithra Natarajan on their new born baby 🧡#SRH #OrangeArmy pic.twitter.com/Sy9RgqbTjJ
— SunRisers Hyderabad (@SunRisers) November 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sending all our love and good wishes to @Natarajan_91 & Pavithra Natarajan on their new born baby 🧡#SRH #OrangeArmy pic.twitter.com/Sy9RgqbTjJ
— SunRisers Hyderabad (@SunRisers) November 6, 2020Sending all our love and good wishes to @Natarajan_91 & Pavithra Natarajan on their new born baby 🧡#SRH #OrangeArmy pic.twitter.com/Sy9RgqbTjJ
— SunRisers Hyderabad (@SunRisers) November 6, 2020
दरम्यान, बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात नटराजनने १८व्या षटकात परफेक्ट यॉर्कर टाकून मैदानात तळ ठोकून उभारलेल्या एबी डिव्हिलियर्सची खेळी संपुष्टात आणली. डिव्हिलियर्स बाद झाल्याने बंगळुरुच्या संघाला १३१ धावांपर्यंत मजल मारता आली. याआधी नटराजनने स्पर्धेत एमएस धोनी, विराट कोहली, आंद्रे रसेल आणि शेन वॉटसन यासारख्या दिग्गज खेळाडूंना बाद केले आहे.
असा रंगला सामना -
बंगळुरुने हैदराबादला १३२ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान विल्यमसन-होल्डर या जोडीने संयमी फलंदाजी करत पूर्ण केले. विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून राहत विल्यमसनने नाबाद ५० धावा केल्या. त्याला होल्डरने नाबाद २४ धावा करत मोलाची साथ दिली.
हेही वाचा - IPL २०२० : विराटला कर्णधारपदावरून हटवण्याची आली वेळ; दिग्गजाचे मत
हेही वाचा - चार आंतरराष्ट्रीय कर्णधारांच्या कामगिरीच्या जोरावर 'हैदराबाद एक्सप्रेस' सुसाट