ETV Bharat / sports

श्रीशांत म्हणतो, 'मला 'अशा' पद्धतीने करियर संपवायचे आहे' - बीसीसीआय

श्रीशांत म्हणाला, 'आजच्या निर्णयामुळे मी खूप खूष आहे. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्या हितचिंतकांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. मी आता ३६ वर्षांचा आहे. आणि पुढच्या वर्षी मी ३७ वर्षांचा होईन. कसोटी कारकिर्दीत माझ्या ८७ विकेट्स आहेत. माझे ध्येय आहे की  मला १०० विकेट्स घेऊन कारकिर्द संपवायची आहे. मला नेहमी विराटच्या नेतृत्वाखाली खेळायची इच्छा होती.'

श्रीशांत म्हणतो, 'मला 'अशा' पद्धतीने करियर संपवायचे आहे'
author img

By

Published : Aug 20, 2019, 9:54 PM IST

नवी दिल्ली - टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज श्रीशांत आपल्या क्रिकेट कारकिर्दीत परतण्यास उत्सुक आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेल्या श्रीशांतला बीसीसीआयने दिलासा दिला. बीसीसीआयने श्रीशांतवरची आजीवन बंदी ७ वर्षाने कमी केली आहे. या निर्णयानंतर, श्रीशांतने आपली प्रतिक्रिया दिली.

श्रीशांत म्हणाला, 'आजच्या निर्णयामुळे मी खूप खूष आहे. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्या हितचिंतकांना धन्यवाद देऊ इच्छितो. मी आता ३६ वर्षांचा आहे आणि पुढच्या वर्षी मी ३७ वर्षांचा होईन. माझ्या कसोटी कारकिर्दीत ८७ विकेट्स आहेत. माझे ध्येय आहे की, मला १०० विकेट्स घेऊन कारकिर्द संपवायची आहे. मला नेहमी विराटच्या नेतृत्वाखाली खेळायची इच्छा होती.'

या अगोदर मार्च २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने श्रीशांतवरची आजीवन बंदी हटवली होती. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला या बंदीबद्दल विचार करण्यास सांगितले होते. ही आजीवन बंदी जास्त आहे, असे न्यायालयाने सांगितले होते. न्यायमूर्ती डी. के. जैन म्हणाले, 'श्रीशांतचे वय आता ३५ वर्षांपलिकडे झाले आहे. त्याने आपल्या क्रिकेटचा चांगला काळ मैदानाबाहेर घालवला असून जवळपास ६ वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याच्यावरील आजीवन बंदी उठवून त्याला ७ वर्षांच्या बंदीची शिक्षा देण्यात आली आहे. त्याच्या या बंदीचा कालावधी सप्टेंबर २०२० मध्ये पूर्ण होईल. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करु शकतो.

श्रीशांत या बंदीतून १३ सप्टेंबर २०२० ला सुटणार आहे. २००५ मध्ये श्रीशांतने श्रीलंकेविरुद्ध नागपूर येथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००६ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. २७ कसोटीत त्याने ८७ तर ५३ एकदिवसीय सामन्यात त्याने ७५ विकेट्स घेतल्या आहेत.

Intro:Body:

श्रीशांत म्हणतो, 'मला 'अशा' पद्धतीने करियर संपवायचे आहे'

नवी दिल्ली -  टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आपल्या क्रिकेट कारकिर्दीत परतण्यास उत्सुक आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला भारताचा वेगवान गोलंदाज श्रीशांतला बीसीसीआयने दिलासा दिला. बीसीसीआयने श्रीशांतवरची आजीवन बंदी ७ वर्षाने कमी केली आहे.  या निर्णयानंतर, श्रीशांतने आपली प्रतिक्रिया दिली.

श्रीशांत म्हणाला, 'आजच्या निर्णयामुळे मी खुप खुष आहे. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्या हितचिंतकांना धन्यवाद देऊ इच्छितो. मी आता ३६ वर्षांचा आहे. आणि पुढच्या वर्षी मी ३७ वर्षांचा होईन. माझ्या कसोटी कारकिर्दीत ८७ विकेट्स आहेत. माझे ध्येय आहे की  मला '१०० विकेट्स घेऊन कारकिर्द संपवायची आहे. मला नेहमी विराटच्या नेतृत्वाखाली खेळायची इच्छा होती.'

श्रीशांत या बंदीतून १३ सप्टेंबर २०२०ला सुटणार आहे. २००५ मध्ये श्रीशांतने श्रीलंकाविरुद्ध नागपुर येथे एकदिवसीय पदार्पण केले होते. २००६ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. २७ कसोटीत त्याने ८७ तर ५३ एकदिवसीय सामन्यात त्याने ७५ विकेट्स घेतल्य़ा आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.