ETV Bharat / sports

सचिन, विराटसह क्रिकेट विश्वातील खेळाडूंनी इरफान खान यांना वाहिली श्रद्धांजली

इरफान यांच्या अचानक जाण्याने सर्वच स्तरातून दु: ख व्यक्त केले जात आहे. क्रिकेट विश्वातून भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, गौतम गंभीर, मोहम्मद कैफ, शिखर धवन, सुरेश रैना, मोहम्मद शमी, सिद्धार्थ कौल आदि खेळाडूंनी त्यांना ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली.

Sports Fraternity Mourns Irrfan Khan's Death, Virat Kohli Leads Condolences
सचिन, विराटसह क्रिकेट विश्वातील खेळाडूंनी इरफान खान यांना वाहिली श्रद्धांजली
author img

By

Published : Apr 29, 2020, 3:38 PM IST

Updated : Apr 29, 2020, 3:43 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज सकाळी (बुधवारी) उपचारादरम्यान, त्याची प्राणज्योत मालवली. इरफान यांच्या अचानक जाण्याने सर्वच स्तरातून दु: ख व्यक्त केले जात आहे. क्रिकेट विश्वातून भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, गौतम गंभीर, मोहम्मद कैफ, शिखर धवन, सुरेश रैना, मोहम्मद शमी, सिद्धार्थ कौल आदि खेळाडूंनी त्यांना ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली.

  • Sad to hear the news of #IrrfanKhan passing away. He was one of my favorites & I’ve watched almost all his films, the last one being Angrezi Medium. Acting came so effortlessly to him, he was just terrific.
    May his soul Rest In Peace. 🙏🏼
    Condolences to his loved ones. ☹️ pic.twitter.com/gaLHCTSbUh

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Saddened to hear about the passing of Irrfan Khan. What a phenomenal talent and dearly touched everyone's heart with his versatility. May god give peace to his soul 🙏

    — Virat Kohli (@imVkohli) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • A great actor and a great talent. Heartfelt
    Condolences to his family and well - wishers #IrfanKhan

    — Virender Sehwag (@virendersehwag) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • R.I.P @irrfank Ji. Always enjoyed your amazing work and your mind-blowing skills as an actor and artist. Sincere condolences and prayers for the family. 🙏 pic.twitter.com/dh6QdDs9nh

    — Shikhar Dhawan (@SDhawan25) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Saddened to hear about #IrrfanKhan’s demise. My heartfelt condolences to his family. One of my favourite actors, gone too soon. His work will live on forever. RIP, Irrfan. pic.twitter.com/nEbbiPfEu7

    — Mohammad Kaif (@MohammadKaif) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Saddened to hear the passing away of #IrfanKhan. Condolences to the entire family. An actor of great caliber! You will be cherished by us until eternity. RIP. pic.twitter.com/wLTWUz8w6Z

    — Mohammad Shami (@MdShami11) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Heartbroken. Don't know why but this loss feels personal. RIP Irrfan, you made Indian cinema richer with your presence. Great great loss for the nation. #IrrfanKhan pic.twitter.com/h83Dhj2r0D

    — Siddharth Kaul (@sidkaul22) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Saddened to hear the passing away of #IrrfanKhan. A wonderful actor. Gone too soon. My heartfelt condolences to his family and friends.

    — Anil Kumble (@anilkumble1074) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • There are actors who have the ability to move you with every performance, irrespective of role or medium! Irrfan Khan was one of those rare gems! Indispensable. He went too soon! RIP!

    — Gautam Gambhir (@GautamGambhir) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, आपल्या सहज सुंदर अभिनयाने व्यक्तीरेखा जिवंत करणारे अभिनेता इरफान खान यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. इरफान गेल्या दोन वर्षांपासून न्यूरो इंडोक्राईन ट्यूमरने आजारी होते. त्यांच्यावर उपचारानंतर ते अलिकडेच भारतात परतले होते. गेल्या काही दिवसापासून ते भारतात डॉक्टरांच्या निगराणीखाली वावरत होते. काल (मंगळवार) त्यांची अचानक तब्येत बिघडली. देशभरात लॉकडाऊन सूरु असल्याने त्यांच्या दैनंदिन उपचारामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्याने अधिक दक्षता घेण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना मृत्यूने गाठले.

गेल्याच आठवड्यात त्यांना मातृशोक झाला होता. गेल्या आठवड्यात शनिवारी त्यांची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. मात्र लॉकडाऊनमुळे इरफान आईच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकले नव्हते. हे शल्य त्यांच्या मनात कायम राहिले. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या आईचं अंत्यदर्शन घेतलं.

इरफान खान गेली दोन वर्षे न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर या आजाराने त्रस्त होते. यासाठी त्यांच्यावर लंडनमध्ये इलाज सुरू होता. यातून ते बरे झाले. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्यांनी 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट स्वीकारला होता. याचे काही शूटींगही पार पडले होते. हा चित्रपट पूर्ण होणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात असतानाच त्यांनी आजारातून उठल्यानंतर कंबर कसली आणि लंडनमध्ये पुढील शूटींगला सुरूवात केली. त्यानंतरच ते मायदेशी परतले होते.

गेली दोन वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर राहिलेल्या इरफान यांना पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. ठरल्याप्रमाणे 'अंग्रेजी मीडियम' थिएटरमध्ये रिलीज झाला. दरम्यान कोरोना व्हायरसाचा संक्रमणाचा काळ सुरू झाला होता. त्यामुळे भारतात लॉकडाऊन करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. त्यामुळे थिएटरमध्ये लागलेला अंग्रेजी मीडियम लोकांना पाहताच आला नाही. अखेरीस ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता.

जीवन परिचय -

इरफान खान यांचा जन्म राजस्थानातील जयपूर येथे सामान्य कुटुंबात ७ जानेवारी १९६७मध्ये झाला. अभिनयाची आवड असलेल्या इरफान यांनी अनेक नाटकातून अभिनय सादर केल्यानंतर दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. त्यांनी अनेक नाटकांसोबतच हिंदी, इंग्रजी सिनेमाधूनही अभिनय केला. ए माइटी हार्ट, स्लमडॉग मिलियनेयर आणि द अमेजिंग स्पाइडर मॅन या हॉलिवूड चित्रपटात ते झळकले. सुमारे ७० चित्रपटातून त्यांनी अभिनय केला. 'लाइफ इन अ मेट्रो', 'पानसिंग तोमर', 'द लंच बॉक्स', 'हैदर', 'गुंडे', 'पिकू', 'तलवार', 'हिंदी मीडियम' यासारख्या चित्रपटांमध्ये इरफानने दमदार भूमिका साकारल्या. अंग्रेजी मीडियम हा चित्रपट त्यांच्या अखेरचा चित्रपट ठरला.

इरफान खान यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २००८मध्ये 'लाइफ इन अ... मेट्रो' या चित्रपटासाठी त्यांची निवड फिल्मफेअर पुरस्कारासाठी झाली होती. २००४ मध्ये त्यांनी 'हासिल' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारही मिळवला होता. २०११ मध्ये त्यांना भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.-

हेही वाचा - इरफान खानच्या निधनाने बॉलीवूडमध्ये पोकळी.. मनोरंजन विश्वावर शोककळा

हेही वाचा - अलविदा इरफान....प्रतिभावंत अभिनेत्याच्या निधनांन बॉलिवूड हळहळलं

Last Updated : Apr 29, 2020, 3:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.