चेन्नई - आयपीएलच्या १२ व्या सीजनाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. याचवेळी चेन्नई सुपरकिंग्सला झटका बसला आहे. सीएसकेचा स्टार गोलंदाज लुंगी एन्गिडी साइड स्ट्रेनमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा हा वेगवान गोलंदाज मागील वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये सीएसकेच्या संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. लुंगीने ७ सामन्यात ११ गडी बाद केले. त्यात १० धावात ४ गडी बाद ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे.
दक्षिण आफ्रिका संघाचे व्यवस्थापक डॉ. मोहम्मद मोसाजी याबाबत माहिती देताना म्हणाले की, श्रीलंकाविरुद्ध न्यूलँड्स येथे खेळताना लुंगीला गोलंदाजी करताना खूप त्रास झाला. त्यानंतर त्याला गोलंदाजी करू दिले नाही. स्कॅनिग केल्यावर त्याचे स्नायू दुखावल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी त्याला विश्वचषकापूर्वी ४ आठवडे आराम देण्याची गरज आहे.