नवी दिल्ली - दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा आयपीएलमधून बाहेर पडला असून लवकरच तो मायदेशी परतणार आहे. पाठीच्या दुखण्याने त्रस्त असल्याने रबाडाला आता दक्षिण आफ्रिकेत परतावे लागणार आहे.
![Kagiso Rabada](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3176976_delhi-capitals-players-kagiso-rabada_16a64c39cfb_large.jpg)
आयपीएलच्या या सत्रात पर्पल कॅपचा मानकरी असलेल्या २३ वर्षीय राबाडाने दिल्लीसाठी या मोसमात शानदार गोलंदाजी करताना १२ सामन्यांमध्ये सर्वाधिक २५ विकेट घेतले आहेत. दुखापतीमुळे तो चेन्नईविरुद्धचा सामनाहि खेळू शकला नव्हता. त्या सामन्यात दिल्लीचा तब्बल ८० धावांनी पराभव झाला होता.
इंग्लंड येथे ३० मे पासून सुरू होणाऱ्या आयसीसी विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकन संघात राबाडाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने सध्या रबाडाला आराम करण्याचा सल्ला दिला आहे