मुंबई - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे दिल्ली येथे आगमन झाले आहे.
हेही वाचा - राशिदच्या 'कॅमल बॅट'चं रहस्य काय?
या मालिकेतील पहिला सामना धर्मशाळा येथे होणार आहे. त्यामुळे आफ्रिकेच्या १६ जणांचा चमू धर्मशाळा येथे आज मंगळवारी रवाना होईल. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता आफ्रिका संघासह त्यांचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शोएब मांजराही भारत दौऱ्यावर आले आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या भितीने याआधी इंग्लंड संघाने श्रीलंकन खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इंग्लंडचा संघ श्रीलंकेच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱ्याआधीच इंग्लंडचा कर्णधार जो रुटने संघातील खेळाडूंची भूमिका स्पष्ट केली. आता दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही हस्तांदोलन करणार नसल्याचे सांगितले आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक -
- पहिला एकदिवसीय सामना - १२ मार्च धर्मशाळा
- दुसरा एकदिवसीय सामना - १५ मार्च लखनऊ
- तिसरा एकदिवसीय सामना - १८ मार्च कोलकाता