ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आफ्रिकेचा संघ जाहीर, डी कॉककडे संघाची धुरा

author img

By

Published : Feb 18, 2020, 11:37 AM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपला १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने क्विंटन डी कॉक याच्याकडे सोपविले आहे.

south africa squad announced for t20 series against australia
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आफ्रिकेचा संघ, डी कॉककडे संघाचं नेतृत्व

केपटाउन - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपला १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने क्विंटन डी कॉक याच्याकडे सोपविले आहे. तर फाफ डु प्लेसिस आणि कागिसो रबाडा यांना मायदेशात होणाऱ्या या मालिकेसाठी आफ्रिकन संघात परत बोलवले आहे.

south africa squad announced for t20 series against australia
फाफ डु प्लेसिस

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होईल. पहिला सामना जोहान्सबर्गच्या मैदानात खेळला जाणार आहे. चेंडू छेडछाड प्रकरणानंतर ऑस्ट्रेलिया प्रथमच दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघात टी-२० मालिकेनंतर ३ सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळली जाणार आहे.

कागिसो रबाडा

दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर डु प्लेसिसने कसोटी आणि टी-२० च्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. तर दुसरीकडे, राबाडाला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती.

असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ -

क्विंटन डी कॉक (कर्णधार ), टेम्बा बावुमा, फाफ डु प्लेसिस, बोर्न फोर्टुइन, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्टजे, एंडिल फेहलुकवाओ, ड्वाइन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, जे-जे स्मट्स, डेल स्टेन, पिटे वॅन बिलजन आणि रासी वॅन डर डूसेन.

हेही वाचा -

VIDEO: सचिनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, क्रीडा क्षेत्रातील 'ऑस्कर'ने सन्मान

हेही वाचा -

Women T२० WC २०२० : भारतीय संघाची कामगिरी अन् विश्व करंडकाबाबत बरंच काही, जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.