जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने (सीएसए) २०२०-२१ हंगामात देशांतर्गत आंतरराष्ट्रीय मालिकांची घोषणा केली आहे. यामध्ये इंग्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघांसोबतच्या क्रिकेट मालिकेचे आयोजन केले जाईल. घरगुती मोसमानुसार, दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंड विरुद्ध २७ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर संघ २६ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे.
-
#CSAnews Bumper 2020/2021 international season ahead for the #Proteas men https://t.co/IVnZdyk086 pic.twitter.com/QnTrnUvQXw
— Cricket South Africa (@OfficialCSA) October 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#CSAnews Bumper 2020/2021 international season ahead for the #Proteas men https://t.co/IVnZdyk086 pic.twitter.com/QnTrnUvQXw
— Cricket South Africa (@OfficialCSA) October 27, 2020#CSAnews Bumper 2020/2021 international season ahead for the #Proteas men https://t.co/IVnZdyk086 pic.twitter.com/QnTrnUvQXw
— Cricket South Africa (@OfficialCSA) October 27, 2020
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी-मार्चमध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करेल. ऑस्ट्रेलियानंतर पाकिस्तानचा संघ एप्रिलच्या अखेरीस तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत जाईल.
''स्थानिक हंगामातील पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर केल्याने आम्हाला आनंद झाला. आमच्या क्रिकेट चाहत्यांसाठी अधिक चांगली बातमी सांगण्यात आनंद झाला आहे", असे सीएसएचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी कुगेंद्री गोवेंडर यांनी एका निवेदनात म्हटले आहे.