नवी दिल्ली - पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक रशीद लतीफ यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्या चार देशांच्या प्रस्तावित स्पर्धेची कल्पना उधळून लावली आहे. 'बिग थ्री' मॉडेलप्रमाणेच ही कल्पनाही फ्लॉप होईल असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - आफ्रिकेविरूद्ध मैदानात उतरताच इंग्लंडचा अँडरसन ठोकणार दीडशतक!
'चार संघांना ही स्पर्धा खेळून उर्वरित संघांना एकटे सोडवायचे आहे जे चांगले नाही. परंतु मला वाटते की काही वर्षांपूर्वी आणले गेलेले बिग थ्री मॉडेलसारखी ही संकल्पना आहे', असे लतीफ यांनी एका युट्यूब व्हिडिओमध्ये म्हटले. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर, सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. प्रथम भारत आणि बांगलादेश दरम्यान घरच्या मैदानावर दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात आला. त्यानंतर गांगुलीने '२०२१ मध्ये पहिल्यांदा चार देशांची मालिका खेळवण्यात येणार असून ही मालिका प्रथम भारतात होईल', असे असे म्हटले होते.
तत्पूर्वी, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) चार देशांच्या स्पर्धेच्या मुद्यावर बीसीसीआयशी बोलणी झाले असल्याचे म्हटले होते. 'आम्ही मोठ्या देशांच्या नेत्यांशी सतत भेट घेत असतो आणि खेळाविषयी चर्चा करीत असतो. आपल्या सर्वांना माहित आहे की जागतिक क्रिकेटचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे. त्यामुळे आम्हाला याची जाणीव आहे की त्याबद्दल बरीच चर्चा केली जाईल आणि असे काही लोक आहेत जे चर्चा करतील आणि जे योग्य ते करतील', असे ईसीबीने म्हटले आहे.