मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर भारताचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुलीची निवड निश्चित मानली जात आहे. या पदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या तुलनेत गांगुलीचे पारडे जड मानले जात असून गांगुलीच्या नावे अधिक पसंती असल्याची सुत्रांची माहिती आहे. गांगुलीसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांची सचिव, तर अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होण्याची शक्यता आहे.
आज (सोमवार) बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. मात्र अद्याप बीसीसीआयच्या प्रमुख पदावरिल सर्व उमेदारांच्या विरोधात कोणीही अर्ज भरलेला नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अध्यपदासाठी सौरव गांगुली आणि ब्रिजेश पटेल यांच्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली, तर गांगुली या पदावर २०२० पर्यंत कार्यरत राहणार आहे. गांगुलीकडे जर बीसीसीआयची धुरा आली तर तो कशा प्रकारे कारभार सांभाळणार याची चर्चा आतापासूनच रंगली आहे. कारण गांगुली आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. त्यामुळे गांगुली आणि शास्त्री मतभेद विसरुन भारतीय संघाला कशाप्रकारे पुढे घेऊन जातील हे पाहणे औत्युक्याचे ठरेल.
हेही वाचा - जागतिक कसोटी अजिंक्यपद: भारताचे अव्वलस्थान भक्कम तर पाकिस्तान तळाला
हेही वाचा - बीसीसीआयच्या अध्यक्षपदी ‘दादा’, गांगुली अमित शाहंच्या पुत्रासह सांभाळणार धुरा?