हैदराबाद - भारतात क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चाहते या खेळासोबत क्रिकेटपटूंनाही खूप मानतात. या क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक जीवनाकडेही चाहत्यांचे लक्ष असते. आता अशीच एक बातमी कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) युवा फलंदाज शुबमन गिलविषयी समोर आली आहे.
शुबमन हा भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. सारा आणि शुबमन यांनी सोशल मीडियावर नुकतेच स्वत:चे फोटो शेअर केले होते. हे फोटो वेगळे असले तरी, या फोटोंचे कॅप्शन एकसारखेच होते. ''आय स्पाय'', असे या कॅप्शनमध्ये म्हटले गेले आहे.
-
I spy 👀 pic.twitter.com/qRjIHViYND
— Shubman Gill (@RealShubmanGill) July 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I spy 👀 pic.twitter.com/qRjIHViYND
— Shubman Gill (@RealShubmanGill) July 29, 2020I spy 👀 pic.twitter.com/qRjIHViYND
— Shubman Gill (@RealShubmanGill) July 29, 2020
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
2018 च्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा विजेत्या भारतीय संघाचा भाग असणारा शुभमन हा भविष्यातील खूप मोठा फलंदाज मानला जातो. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे.
या घटनेवरून नेटिझन्सनी शुबमनला ट्रोल केले. विशेष म्हणजे तो19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. 20 वर्षीय शुबमनने केकेआरकडून 27 सामने खेळले असून 499 धावा केल्या आहेत.