नवी दिल्ली - वेस्ट इंडीजविरुद्धचा दौरा संपल्यानंतर, भारतीय संघ दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मालिका खेळणार आहे. १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. तर, आता आफ्रिका 'अ' संघाविरुद्ध चार दिवसीय कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
हेही वाचा - अखेर 'तो' विक्रम इशांतने मोडलाच!
या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत 'अ' संघाला दोन नवीन कर्णधार मिळाले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात शुभमन गिल भारत 'अ' संघाचे नेतृत्व करणार आहे. तर, दुसऱ्या सामन्यासाठी यष्टीरक्षक वृद्धीमान साहाकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तिरुअनंतपुरम येथे ९ सप्टेंबरपासून पहिल्या तर, १७ सप्टेंबरपासून मैसूर येथे दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.
भारत 'अ' संघ (पहिला कसोटी सामना) -
- शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अनमोलप्रीत सिंह, रिकी भुई, अंकित बावने, के.एस. भारत (यष्टीरक्षक), कृष्णप्पा गौतम, शाहबाज नदीम, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, तुषार देशपांडे, शिवम दुबे, विजय शंकर
भारत 'अ' संघ (दुसरा कसोटी सामना) -
- प्रियांक पांचाळ, अभिमन्यू इश्वरन, शुभमन गिल, अनमोलप्रीत सिंह, करुण नायर, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक आणि कर्णधार), कृष्णप्पा गौतम, कुलदीप यादव, शाहबाज नदीम, विजय शंकर, शिवम दुबे, उमेश यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान