मुंबई - भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा हिच्या डान्सचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात धनश्री दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्यासोबत डान्स करताना पाहायला मिळत आहे.
युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री ही डॉक्टर, कोरियोग्राफर आणि यूट्यूबर आहे. तिच्या डान्सच्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाइक्स, कमेंट्स येतात. तसेच तिचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील होतात. धनश्रीचे इन्स्टाग्राम, यूट्यूबवर लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स असून तिची एक स्वत:ची डान्स कंपनीदेखील आहे.
धनश्री आतापर्यंत अनेक भारतीय नामवंतासोबत डान्स करताना पाहायला मिळाली आहे. आता तिने श्रेयस अय्यर सोबत डान्स केला आहे. श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन दोघांच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहलने धनश्री वर्मा हिच्यासोबत मागील वर्षी २२ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे.
विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी श्रेयसकडे मुंबईची धुरा
विजय हजारे करंडक स्पर्धेला २० फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबई संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे सोपविण्यात आली आहे. अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे सय्यद मुश्ताक अली करंडक खेळू शकला नव्हता. आता तो दुखापतीतून सावरला आहे.
हेही वाचा - विजय हजारे करंडकासाठी मुंबई संघाची घोषणा, अय्यरकडे संघाची कमान
हेही वाचा - ICC Test Ranking : विराटची मोठी घसरण, रुटची झेप