ETV Bharat / sports

भंडाऱ्यातील अग्नितांडवात 10 नवजात चिमुकल्यांचा मृत्यू, शोएबने व्यक्त केली हळहळ - shoaib akhtar news

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भंडारा अग्नितांडव प्रकरणावर एक ट्विट केले आहे. यात त्याने, शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना खूपच धक्कादायक आणि दु:खद आहे, असे म्हटलं आहे.

shoaib akhtar pays tribute on the death of newborn baby in fire broke incident in bhandara maharashtra
भंडाऱ्यातील अग्नितांडवात 10 नवजात चिमुकल्यांचा मृत्यू, शोएबने व्यक्त केली हळहळ
author img

By

Published : Jan 10, 2021, 9:14 AM IST

मुंबई - भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीत 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला. तर 7 चिमुकल्यांना वाचविण्यात यश आले. या घटनेवर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. आता तर थेट पाकिस्तानातून देखील हळहळ व्यक्त होत आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भंडारा अग्नितांडव प्रकरणावर एक ट्विट केले आहे. यात त्याने, शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना खूपच धक्कादायक आणि दु:खद आहे, असे म्हटलं आहे.

  • Very very sad news 😭😭newborn babies died after fire broke out in the Special Newborn Care Unit of a hospital in Maharashtra in the early hours of Saturday, doctors said

    — Shoaib Akhtar (@shoaib100mph) January 9, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शोएब अख्तरच्या या ट्विटनंतर पाकिस्तानच्या काही नागरिकांनीही ट्विटरद्वारे शोक व्यक्त केला आहे. शोएबच्या ट्विटवर अनेकांनी संवेदना जागवणारे तसेच भावनिक मेसेज केले आहेत. तर काहींनी शोएबला सुनावले आहे.

शोएबच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेते राहुल गांधी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.

काय आहे घटना -

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री जवळपास दोन वाजता ही आग लागली. SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालके होती. त्यापैकी 7 बालकांना वाचविण्यात यश आले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले. तसेच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देणार असल्याचे देखील सांगितले. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारी रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा - IND VS AUS: भारतीय संघाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त जडेजा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर

हेही वाचा - IND vs AUS : दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकत स्मिथने पटकावलं दिग्गजांच्या यादीत स्थान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.