नवी दिल्ली - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहलीविषयी आपले मत दिले आहे. एक धोकादायक फलंदाज म्हणून विराट कोहली उदयास आला. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या वर्षात तो सणकी (brat) होता, असे अख्तरने सांगितले.
अख्तर म्हणाला, "विराट कोहली आता वेगळ्या स्तरावर पोहोचला आहे, पण कोहली ब्रँडच्या मागे कोण आहे? २०१०, २०११ मध्ये कोहली कोठेही दिसत नव्हता. तो माझ्यासारखा एक सणकी (brat) होता. अचानक व्यवस्थेने त्याला खूप पाठिंबा दर्शवला. व्यवस्थापनाने त्याच्यावर काम केले. त्यालाही समजले, की त्यांचा मान-सन्मान पणाला लागला आहे."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
कोहली आणि तेंडुलकर यांच्या तुलनेवरूनही अख्तरने भाष्य केले. तो म्हणाला, ''कोहली अतिशय सोप्या टप्प्यात खेळला आहे, परंतु त्याने खूप कमावले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा आणि शतके ठोकण्याच्या बाबतीत कोहलीचे नाव येते. तसेच कोहली हा जगातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक २७९४ धावा करणारा खेळाडू आहे.
"अशा काळात खेळत आहे, ही कोहलीची चूक नाही, हा सोपा काळ आहे. सचिन तेंडुलकर किंवा वसीम अक्रम, वकार, इंझमाम यांनी अतिशय कठीण काळात क्रिकेट खेळले आहे. जर तो धावा करत असेल, तर आम्ही काय म्हणू शकतो?", असेही अख्तरने म्हटले आहे.