नवी दिल्ली - सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी राष्ट्रीय टी-२० स्पर्धेत भारताचा सलामीवीर शिखर धवन दिल्लीच्या २० सदस्यीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या टी -२० स्पर्धेमुळे भारताचा २०२०-२१ देशांतर्गत हंगाम पुढील महिन्यात सुरू होईल.
हेही वाचा - ICC पुरस्कारांवर भारताची मोहोर; विराट- धोनीने पटकावले 'हे' पुरस्कार
इंडियन प्रीमियर लीगदरम्यान हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाहेर गेलेला वेगवान गोलंदाज इशांत शर्मालाही दिल्लीच्या संघात स्थान मिळाले आहे. मात्र, इशांत सर्व सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. नितीश राणा, पवन नेगी, मनजोत कालरा या खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे.
ही स्पर्धा १० जानेवारीपासून सुरू होईल. दिल्लीला मुंबई, आंध्र प्रदेश, केरळ आणि पुडुचेरीसह एलिट ग्रुप ईमध्ये स्थान देण्यात आले आहे. या गटाचे लीग सामने वानखेडे स्टेडियमवर खेळले जातील. दिल्लीचा संघ आपला पहिला सामना ११ जानेवारी रोजी यजमान मुंबई विरुद्ध खेळणार आहे.