नवी दिल्ली - भारताचे सर्वात जुने स्टेडीयम म्हणून ओळखले जाणारे फिरोज शाह कोटला स्टेडीयम आता दिवंगत माजी मंत्री अरुण जेटली यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. दिल्ली क्रिकेट संघाचे (डीडीसीए) अध्यक्ष रजत शर्मा यांनी जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. तसेच जेटली स्टेडीयमच्या एका पॅव्हेलियनला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आले आहे.
हेही वाचा - किंग कोहलीने मैदानाच्या बाहेर केला मोठा विक्रम, सचिनला टाकले मागे
या दरम्यान, डावखुरा फलंदाज शिखर धवन आणि इतर खेळाडूही या कार्यक्रमाला उपस्थित होते. धवनने विराटचे ड्रेसिंगरुममधील एक गुपित सांगितले आहे. विराट जेव्हा चांगल्या मूडमध्ये असतो तेव्हा कोणती गाणी ऐकतो असा प्रश्न कार्यक्रमामध्ये शिखरला विचारण्यात आला होता. तेव्हा शिखर धवनचे त्याचे उत्तर दिले.
शिखर म्हणाला, 'विराटला पंजाबी गाणी खुप आवडतात. तो गुरदास मान यांची गाणी ऐकतो. रोमँटिक गाणी सांगायची झाली तर, अरिजित सिंगची गाणी त्याला खुप आवडतात.' विराटच्या गाण्यांचा प्रश्न आधी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना विचारण्यात आला होता. मात्र, त्यांनी हा प्रश्न शिखरला विचारण्यात यावा असे सांगितले.
-
#TeamIndia's @RaviShastriOfc & @SDhawan25 spill the beans on @imVkohli's music playlist 🎶🎶 pic.twitter.com/ILLybVolDT
— BCCI (@BCCI) September 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#TeamIndia's @RaviShastriOfc & @SDhawan25 spill the beans on @imVkohli's music playlist 🎶🎶 pic.twitter.com/ILLybVolDT
— BCCI (@BCCI) September 13, 2019#TeamIndia's @RaviShastriOfc & @SDhawan25 spill the beans on @imVkohli's music playlist 🎶🎶 pic.twitter.com/ILLybVolDT
— BCCI (@BCCI) September 13, 2019
पॅव्हेलियनला नाव दिल्यानंतर विराटची प्रतिक्रिया -
विराट कोहली म्हणाला, "इतका मोठा सन्मान केल्याबद्दल मी रजत शर्मा, भारतीय संघ, दिल्लीचे इतर संघ तसेच बीसीसीआयचा ऋणी आहे." तसेच कोहलीने आपल्या लहानपणीच्या प्रशिक्षकांचे सुद्धा आभार मानले आहेत. मी असा कधी विचारही केला नव्हता की, माझ नावं पॅव्हेलियनला दिले जाईल. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया कोहलीने व्यक्त केली आहे.