नवी दिल्ली - भारताच्या कसोटी संघातून बाहेर असलेल्या सलामीवीर शिखर धवनचे नवीन टॅलेंट जगासमोर आले आहे. धवनचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धवन एका समुद्रकिनाऱ्यावर बासरी वाजवताना दिसत आहे.
हेही वाचा - US OPEN : जगज्जेत्या ओसाकाला पराभवाचा धक्का तर, नदालची उपांत्यपूर्व फेरीत धडक
धवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये धवन सुरेल बासरी वाजवताना दिसत आहे. शिखर धवनच्या या टॅलेंटला चाहत्यांनी मनमुरादपणे दाद दिली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने म्हटले आहे, 'निसर्ग, हवा, समुद्र आणि संगीतासोबत एक नवीन सुरुवात.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नुकत्याच झालेल्या विंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत धवनला चांगली कामगिरी करता आली नव्हती. धवनला आता भारताच्या 'अ' संघात स्थान मिळाले आहे. आफ्रिकेच्या 'अ' संघाविरुद्ध धवन दोन एकदिवसीय सामने खेळणार आहे. अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी ३३ वर्षीय धवनचा समावेश करण्यात आला आहे.
धवनने गेल्या पाच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अवघ्या ६५ धावा केल्या आहेत. हाताच्या दुखापतीमुळे धवनला विश्वकरंडक स्पर्धा अर्धवट सोडून घरी परतावे लागले होते. आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.