ETV Bharat / sports

धवनचा मुलासोबतचा ‘कुल’ डान्स व्हायरल...पाहा व्हिडिओ - shikhar dhawan and zoravar latest dance news

धवनने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने मुलगा झोरावरसोबत बॉलिवूडच्या ‘डॅडी कुल’ गाण्यावर ठेका धरला. “या मजेदार माणसाबरोबर आयुष्य खूप मजेदार आहे! खरे सांगायचे तर, वडील आणि मुलगा दोघेही छान आहेत!”, असे धवनने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

Shikhar Dhawan dances with son Zorawar on 'Daddy Cool'
धवनचा मुलासोबतचा ‘कुल’ डान्स व्हायरल...पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Apr 17, 2020, 5:34 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या जागतिक साथीमुळे सर्व क्रीडा क्रियाकलाप ठप्प झाले आहेत. यामुळे इंडियन प्रीमियर लीगही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. लॉकडाऊन असल्यामुळे अनेक क्रिकेटपटू कुटुंबासमवेत वेळ घालवत आहेत. दरम्यान भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनही कुटुंबासोबत असून त्याचा एक डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

धवनने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने मुलगा झोरावरसोबत बॉलिवूडच्या ‘डॅडी कुल’ गाण्यावर ठेका धरला. “या मजेदार माणसाबरोबर आयुष्य खूप मजेदार आहे! खरे सांगायचे तर, वडील आणि मुलगा दोघेही छान आहेत!”, असे धवनने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

धवनच्या या व्हिडिओवर हरभजन सिंगने आपली प्रतिक्रिया दिली. “गुड जट्टा, झोरा पुत्त, सुपर एक्टिंग”, असे भज्जीने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. विशेष म्हणजे शिखर धवनला ‘गब्बर’ आणि ‘जट्ट जी’ या नावाने ओळखले जाते.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.