ETV Bharat / sports

सरावासाठी परवानगी न घेतल्याने, बीसीसीआय शार्दुलवर नाराज?

author img

By

Published : May 24, 2020, 1:19 PM IST

Updated : May 24, 2020, 1:52 PM IST

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शार्दुल ठाकूरने आऊटडोअर सरावाला सुरुवात केली. पण त्याचा हा सराव वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण सरावासाठी शार्दुलने परवानगी घेतलेली नसल्याचे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

BCCI not happy as Shardul Thakur trains outdoors in Mumbai without taking board's permission: Report
सरावासाठी परवानगी न घेतल्याने, बीसीसीआय शार्दुलवर नाराज?

मुंबई - आयसीसी आणि बीसीसीआयने ठरवून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करत भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शार्दुल ठाकूरने आउटडोअर सरावाला सुरूवात केली. पण त्याचा हा सराव वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण सरावासाठी शार्दुलने परवानगीच घेतलेली नसल्याचे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

केंद्र सरकारने देशातील मैदाने व स्पोर्टस कॉम्पलेक्स खेळाडूंना सरावासाठी सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी खेळाडूंना काही अटी व नियम घालून दिले आहे. याशिवाय क्रिकेटपटूंसाठी आयसीसी व बीसीसीआयनेही काही मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. याचे पालन करून शार्दुल ठाकूरने आऊटडोर ट्रेनिंग सुरू केले आहे.

लॉकडाऊनमध्ये आऊटडोअर सराव करणारा शार्दुल भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला. त्याने पालघरमधील आपल्या घराजवळील मैदानावर सराव सुरू केला आहे. यावेळी शार्दुलसोबत सराव करण्यासाठी काही स्थानिक खेळाडूही होते, ज्यात मुंबई रणजी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज हार्दिक तामोरेचाही समावेश होता.

शार्दुलने सरावाला सुरुवात करण्याआधी बीसीसीआयची परवानगी घेतलेली नाही. यामुळे बीसीसीआय शार्दुलवर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भातील वृत्त आयएएनएसने दिले आहेत.

आयएएनएस वृत्तसंस्थेला बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'शार्दुल बीसीसीआयशी करारबद्ध खेळाडू असल्याने त्याने सरावाला सुरुवात करण्याआधी परवानगी घ्यायला हवी होती. तो परवानगी न घेताच सरावाला गेला. त्याने असे करायला नको होते, हे योग्य नाही.'

शार्दुलने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी नोंदवली. तेव्हा भारतीय संघात खेळण्याची त्याला संधी मिळाली. त्याने आतापर्यंत 11 एकदिवसीय, 15 टी-20 आणि एका कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. दरम्यान, शार्दुल ठाकूर बीसीसीआयच्या 'क' गटाच्या करार श्रेणीत मोडतो.

हेही वाचा -खेळाडूंचा सराव : आयसीसीची मार्गदर्शकतत्त्वे, चार टप्प्यांत सराव सत्राच्या आयोजनाचा सल्ला

हेही वाचा -सरावाला सुरुवात : शार्दुल ठरला आऊटडोअर ट्रेनिंग करणारा भारताचा पहिला क्रिकेटपटू

Last Updated : May 24, 2020, 1:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.