सिडनी - ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न आणि माजी प्रशिक्षक जॉन बुचानन यांचे संबंध चांगले नसल्याचा खुलासा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने केला आहे. वॉर्न आणि बुचानन दोघे एकत्र राहू शकत नसल्याचेही क्लार्कने सांगितले.
एका मुलाखतीत क्लार्क म्हणाला, "सत्य हे होते की जॉन आणि वॉर्न एकत्र राहू शकत नव्हते. वॉर्नने प्रशिक्षक म्हणून बुचाननचा आदर केला नाही. तो म्हणायचा की ही व्यक्ती मला काय करावे हे सांगू शकत नव्हती. जर तिथे रिकी पाँटिंग असता तर वॉर्नला मार्ग सापडला असता. तो पाँटिंगशी बोलला असता. त्यावेळी वॉर्न बुचाननवर फारच नाराज होता."
वॉर्नबरोबर असताना क्लार्कने ड्रेसिंग रूमच्या दिवसांची आठवण काढली. क्लार्कने सांगितले, की तीन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरातील खेळाडूंना आवश्यक असलेल्या गोष्टीपेक्षा वॉर्नला सिगारेट खरेदी करणे चांगले वाटले. क्लार्क पुढे म्हणाला, "वॉर्नला सिगारेट ओढणे पसंत आहे. त्याने स्पष्टपणे सांगितले होते, की जर सिगारेट आणण्यास परवानगी दिली नाही, तर तो येणार नाही."