ETV Bharat / sports

शाकिब सतत बुकीच्या संपर्कात होता, आयसीसीने शेअर केले शाकिब-बुकीचे व्हॉट्सअॅप मेसेज

author img

By

Published : Oct 30, 2019, 1:17 PM IST

आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या तपशीलात दीपक अग्रवालने शाकिबला २०१७ मध्ये संपर्क केला होता. २०१७ नंतर शाकिब सतत दीपकच्या संपर्कात होता. बांगलादेश प्रीमीयर लीग २०१७ च्या हंगामात शाकिब ढाका डायनामाइट्स संघाचा सद्स्य होता. त्यावेळी देखील दीपक अग्रवालने शाकिबला संपर्क केला असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.

शाकिब सतत बुकीच्या संपर्कात होता, आयसीसीने शेअर केले शाकिब-बुकीचे व्हॉट्सअॅप मॅसेज

दुबई - आयसीसीने लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शाकिब अल हसनवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. बंदीच्या कारवाईनंतर आयसीसीने शाकिब आणि दीपक अग्रवाल नावाच्या बुकी यांच्यात झालेल्या संभाषणाचा तपशील जारी केला आहे. दरम्यान, या घटनेने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या तपशीलाचा घटनाक्रम -
आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या तपशीलात दीपक अग्रवालने शाकिबला २०१७ मध्ये संपर्क केला होता. २०१७ नंतर शाकिब सतत दीपकच्या संपर्कात होता. बांगलादेश प्रीमीयर लीग २०१७ च्या हंगामात शाकिब ढाका डायनामाइट्स संघाचा सदस्य होता. त्यावेळी देखील दीपक अग्रवालने शाकिबला संपर्क केला असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.

दीपकने बांगलादेश प्रीमीयर लीगमध्ये सामन्यांपूर्वी संघाच्या रणणितीविषयीची गुप्त माहिती शाकिबला मागितली होती. मात्र, ही माहिती मी दिली नसल्याचे शाकिबने म्हटले आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये दीपकने व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे शाकिबला भेटण्याची मागणीही केली होती.

जानेवारी २०१८ मध्ये बांगलादेश श्रीलंका आणि झिम्बाब्वे संघातील तिरंगी मालिकेदरम्यान, दीपकने व्हॉट्सअ‍ॅप मॅसेजवर शाकिब संपर्क केला होता. १९ जानेवारी २०१८ ला शाकिबला सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता. यावेळी दीपकने शाकिबला मेसेज करत अभिनंदन केले होते.

२६ एप्रिल २०१८ आयपीएल स्पर्धेदरम्यान, शाकिबला दीपकने मेसेज केला होता. त्यावेळी शाकिब हैदराबाद संघाकडून खेळत होता. हैदराबाद विरुध्द किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यांची माहिती दीपकने शाकिबला मागितली होती. त्यानंतर २६ एप्रिल २०१८ लाही दीपकने शाकिबला मेसेज केला होता.

या सर्व प्रकरणाची माहिती शाकिबने आयसीसीला दिली नाही. त्यामुळे आयसीसीने मंगळवारी शाकिबवर २ वर्षांच्या बंदीची कारवाई केली. शाकिबवर एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी क्रिकेट अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा ः पहिला दिवस-रात्र कसोटी सामना : तिकिटाचे दर पाहून तुम्हीही म्हणाल इतकं स्वस्त कसं

हेही वाचा ः टीम इंडियाची 'गुलाबी' सुरूवात, २२ नोव्हेंबरपासून कोलकात्यात पहिला 'डे-नाईट' कसोटी सामना

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.