नवी दिल्ली - भारत दौऱ्यापूर्वी बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन चांगलाच अडचणीत सापडला आहे. बांगलादेशच्या एका आघाडीच्या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, मॅच फिक्सिंगचा अहवाल न दिल्याबद्दल शाकिबला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलकडून १८ महिन्यांपर्यंतची बंदी घातली जाऊ शकते. आधीच बांगलादेश क्रिकेट बोर्ड, बीसीबीच्या शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे कारणे दाखवा नोटीसला सामोरे जात असलेल्या साकिबच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, मॅच फिक्सिंगसाठी शाकिबकडे एका बुकीने संपर्क साधला होता, परंतु त्याने आयसीसीला याची माहिती दिली नाही.
दोन वर्षांपूर्वी मिळाली ऑफर -
बांगलादेशच्या दैनिक वर्तमानपत्राने दावा केला आहे की, दोन वर्षांपूर्वी फिक्सिंगची ऑफर साकिबला मिळाली होती. सामन्याआधी एका बुकीने शाकिबकडे संपर्क साधला होता. दरम्यान, शाकिबने ही ऑफर नाकारली असली तरी त्याने बेकायदेशीर पध्दतीचा अहवाल दिला नाही आणि त्यामुळे तो आता अडचणीत सापडला आहे. आयसीसीने ब्लॅकलिस्ट केलेल्या बुकीचे कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून आयसीसीला शाकिबच्या मॅच-फिक्सिंगबाबतची माहिती मिळाली.
आयसीसी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला साकिब माहिती देण्यास अपयशी ठरला, त्यामुळे आता त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शाकिबला बीसीबीने संघाच्या अभ्यास सत्रातून सहभागी करून घेतलेले नाही. यामुळे बांगलादेश संघासह शाकिब अडचणीत सापडला आहे.
हेही वाचा - 'कॅप्टन' विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर...
हेही वाचा - सौरव गांगुलींच्या जबराट निर्णयाने प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना येणार 'अच्छे दिन'