अॅडलेड - पाकिस्तान संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. अॅडलेड येथील मैदानावर मालिकेतील दुसरा व अंतिम सामना सुरू आहे. हा सामना दिवस-रात्र पध्दतीने खेळवण्यात येत असून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत पहिल्या दिवशी १ बाद ३०२ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर १६६ तर लाबुशेन १२६ धावांवर नाबाद आहे. या सामन्यात एक मजेशीर किस्सा घडला.
पहिल्या दिवसाच्या ४२ व्या षटकात पाकिस्तानचा गोलंदाज इफ्तेकार अहमद वॉर्नरसमोर गोलंदाजी करत होता. त्याच्या तिसऱ्या चेंडूवर वॉर्नरने एक जोरदार फटका मारला. चेंडू सीमारेषेकडे वेगाने जात होता. तेव्हा सीमारेषेवर पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी हा क्षेत्ररक्षण करत होता. मात्र, शाहीन हा आपल्याच नादात दिसला. त्याला आलेला चेंडू दिसलाच नाही. परिणामी वॉर्नरनला चौकार मिळाला.
-
Whoops! #AUSvPAK | https://t.co/0QSefkJERk pic.twitter.com/HpEwgwlm1H
— cricket.com.au (@cricketcomau) November 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Whoops! #AUSvPAK | https://t.co/0QSefkJERk pic.twitter.com/HpEwgwlm1H
— cricket.com.au (@cricketcomau) November 29, 2019Whoops! #AUSvPAK | https://t.co/0QSefkJERk pic.twitter.com/HpEwgwlm1H
— cricket.com.au (@cricketcomau) November 29, 2019
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा मजेशीर किस्सा आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंवर शेअर केला आहे. शाहीन आपल्याला चेंडू न दिसल्याचे दाखवत होता. मात्र, व्हिडिओमध्ये पूर्णपणे शाहीनचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शाहीनच्या गचाळ क्षेत्ररक्षणानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानची क्षेत्ररक्षणाबाबतची दुखरी बाजू समोर आली आहे. नेटकऱ्यांनी मात्र, सोशल मीडियावर शाहीनची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, शाहीनने सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन वेळा गचाळ क्षेत्ररक्षण केले. एकदा तर त्याने आपल्या बुटाने मारून चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला.
-
😳🙈#AUSvPAK pic.twitter.com/FKkW2VDDFY
— cricket.com.au (@cricketcomau) November 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">😳🙈#AUSvPAK pic.twitter.com/FKkW2VDDFY
— cricket.com.au (@cricketcomau) November 29, 2019😳🙈#AUSvPAK pic.twitter.com/FKkW2VDDFY
— cricket.com.au (@cricketcomau) November 29, 2019
हेही वाचा - इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला मिळाला ब्रिटनचा सर्वात जुना क्रीडा पुरस्कार
हेही वाचा - अभिमन्यू मिथुनचे एका षटकात ५ बळी, याआधी बांगलादेशच्या गोलंदाजाने केलाय हा कारनामा!