मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज शफाली वर्माने नवी उंची गाठली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या महिलांच्या टी-२० क्रमवारीत १६ वर्षाची शफाली प्रथम स्थानावर विराजमान झाली आहे.
हेही वाचा - भारताचा ताजिकिस्तान दौरा रद्द.. वाचा कारण
शफालीने आत्तापर्यंत फक्त १८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असून या क्रमवारीत शफालीने १९ स्थानांची झेप घेतली आहे. तिने आत्तापर्यंत १४६.९६ च्या सरासरीने ४८५ धावा केल्या आहेत. तर सध्या सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत तिने १६१ धावा केल्या आहेत. डावखुरी फलंदाज स्मृती मंधानाची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर, जेमिमा रॉड्रिग्जने नववे स्थान मिळवले आहे.
-
Shafali Verma has risen a remarkable 19 places to claim the top spot among batters.
— ICC (@ICC) March 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
She's just 18 T20I matches and 16 years old 🤯@MRFWorldwide | #ICCRankings pic.twitter.com/CfTYSnaNIc
">Shafali Verma has risen a remarkable 19 places to claim the top spot among batters.
— ICC (@ICC) March 4, 2020
She's just 18 T20I matches and 16 years old 🤯@MRFWorldwide | #ICCRankings pic.twitter.com/CfTYSnaNIcShafali Verma has risen a remarkable 19 places to claim the top spot among batters.
— ICC (@ICC) March 4, 2020
She's just 18 T20I matches and 16 years old 🤯@MRFWorldwide | #ICCRankings pic.twitter.com/CfTYSnaNIc
गोलंदाजांच्या बाबतीत दीप्ती शर्माने पाचवे तर, राधा यादवने सातवे स्थान मिळवले आहे. इंग्लंडची २० वर्षीय सोफी इक्लेस्टोन प्रथम क्रमांकावर पोहोचली आहे. तर, भारताची फिरकीपटू पूनम यादवने आठवे स्थान मिळवले आहे.