नवी दिल्ली - टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आणि क्रिकेटच्या मैदानावर 'दादा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीचा आज ४७ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने दादाला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
सेहवागने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दादाला शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्याने लिहिले आहे, '५६ इंचाची छाती असेलल्या कर्णधाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा. ५६" इंचाची छाती, सातव्या महिन्यातला आठवा दिवस ८x७=५६ आणि विश्वकरंडक स्पर्धेतील सरासरी ५६. #HappyBirthdayDada , May God Bless You !'.
-
Happy Birthday to a 56” Captain , Dada @SGanguly99 !
— Virender Sehwag (@virendersehwag) July 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
56 inch chest,
8th day of the 7th month, 8*7 = 56 and a World Cup average of 56. #HappyBirthdayDada , May God Bless You ! pic.twitter.com/Dcgj9jrEUE
">Happy Birthday to a 56” Captain , Dada @SGanguly99 !
— Virender Sehwag (@virendersehwag) July 8, 2019
56 inch chest,
8th day of the 7th month, 8*7 = 56 and a World Cup average of 56. #HappyBirthdayDada , May God Bless You ! pic.twitter.com/Dcgj9jrEUEHappy Birthday to a 56” Captain , Dada @SGanguly99 !
— Virender Sehwag (@virendersehwag) July 8, 2019
56 inch chest,
8th day of the 7th month, 8*7 = 56 and a World Cup average of 56. #HappyBirthdayDada , May God Bless You ! pic.twitter.com/Dcgj9jrEUE
सौरव गांगुली भारतीय क्रिकेटला यशस्वी दिशा देणारा कर्णधार मानला जातो. गांगुलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात 1992 साली वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना केली. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 311 सामन्यांत 11363 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 22 शतके तर 72 अर्धशतके केली आहेत. कसोटी क्रिकेटचे सांगायचे झाले तर, 113 कसोटीत गांगुलीने 16 शतके आणि 35 अर्धशतकांसह 7212 धावा ठोकल्या आहेत.