नवी दिल्ली - क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं नेहमी म्हटलं जातं. मात्र या खेळात दुबळ्या मानल्या जाणाऱ्या स्कॉटलंड संघाने महापराक्रम करून दाखवला आहे. नेदरलँड्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात स्कॉटलंडने २५२ धावा ठोकल्या आहेत.
-
These two were pretty special today! 200 opening partnership and a special 127 from @GeorgeMunsey . Great to start with a win and @AliEvans647 was 👌🏼 with the ball pic.twitter.com/sYwNCuPL3X
— mark watt (@markwatt123) September 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">These two were pretty special today! 200 opening partnership and a special 127 from @GeorgeMunsey . Great to start with a win and @AliEvans647 was 👌🏼 with the ball pic.twitter.com/sYwNCuPL3X
— mark watt (@markwatt123) September 16, 2019These two were pretty special today! 200 opening partnership and a special 127 from @GeorgeMunsey . Great to start with a win and @AliEvans647 was 👌🏼 with the ball pic.twitter.com/sYwNCuPL3X
— mark watt (@markwatt123) September 16, 2019
हेही वाचा - टेनिस : फायनलमध्ये पराभव...तरीही सुमित नागलने गाठले कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान
स्कॉटलंडची ही टी-२० क्रिकेटमधील सहावी सर्वोत्तम खेळी ठरली. त्यांनी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध केलेल्या २४८ धावांचा विक्रम मोडला आहे. याआधी अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध खेळताना ३ बाद २७८ सर्वोच्च धावा चोपल्या होत्या.
२५२ धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सला ७ बाद १९४ धावा करता आल्या. स्कॉटलंडच्या जॉर्ज मुन्सी आणि गोएत्झर यांनी पहिल्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी केली. टी-२० क्रिकेटमधील ही पहिल्या विकेटसाठी तिसरी सर्वोत्तम भागीदारी आहे. अफगाणिस्तानच्या हजरतुल्ला झझाई आणि उस्मान घनी यांनी आयर्लंडविरुद्ध २३६ धावांची भागीदारी केली होती.
स्कॉटलंडच्या मुन्सीने ५६ चेंडूंत ५ चौकार आणि १४ षटकारांची खेळी करताना नाबाद १२७ धावा केल्या. तर, गोएत्झरने ५ षटकारांसह ८९ धावा केल्या. नेदरलँड्सचा कर्णधार पिटर सीलरने हा पराभव टाळण्यासाठी ९६ धावांची खेळी केली खरी पण त्याला अपयश आले.
२०१७ मध्ये भारतानेही श्रीलंकेविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये ५ बाद २६० धावा केल्या होत्या. हा विक्रम स्कॉटलंडकडून अवघ्या ८ धावांनी वाचला आहे. यामध्ये रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी १६५ धावांची भागीदारी रचली होती.